अस्वीकरण
लग्नाचा बायोडाटा (Lagnacha Biodata) वर बनवलेला बायोडाटा वापरण्यापूर्वी कृपया हे वाचा.
रास, नक्षत्र आणि कुंडलीविषयी
जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ दिल्यावर हे साधन चंद्राच्या स्थानावरून रास, नक्षत्र, चरण, नाडी, गण आणि योनी अंदाजे काढते (लाहिरी अयनांश). हे गणित तुमच्या ब्राउझरमध्ये होते.
- जन्मवेळ थोडी जरी चुकीची असेल, किंवा चंद्र नक्षत्राच्या/राशीच्या सीमेजवळ असेल, तर उत्तर वेगळे येऊ शकते.
- वेगवेगळी पंचांगे आणि ज्योतिषी वेगवेगळ्या पद्धती वापरतात; त्यामुळे तुमच्या पत्रिकेत लिहिलेली माहिती वेगळी असू शकते.
- मंगळ दोष, गुणमिलन किंवा लग्न-मुहूर्त याविषयी हे साधन कोणताही सल्ला देत नाही.
महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या पत्रिकेतील माहिती किंवा जाणकार ज्योतिषांचा सल्ला घ्या. आपोआप भरलेली माहिती तुम्ही कधीही बदलू शकता.
आपोआप भरलेली इतर माहिती
जुन्या बायोडाटाच्या फोटोवरून (OCR) किंवा पेस्ट केलेल्या मजकुरावरून भरलेली माहिती, इंग्रजीतून मराठीत बदललेली अक्षरे आणि “माझ्याबद्दल” लेखन मदत – यात चुका असू शकतात. डाउनलोड करण्यापूर्वी प्रत्येक ओळ तपासा.
सामान्य
ही साइट विवाह-जुळवणी सेवा (marriage bureau) नाही. आम्ही कोणतेही स्थळ सुचवत नाही, व्यक्तींची पडताळणी करत नाही आणि बायोडाटामधील माहितीची खात्री देत नाही. बायोडाटा मिळालेल्या व्यक्तीची माहिती तपासण्याची जबाबदारी संबंधित कुटुंबांची आहे.
